लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 02:37 PM2021-09-29T14:37:23+5:302021-09-29T14:46:09+5:30

मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना तिच्या घरच्यांना संशय आला. त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले

sexual abuse teen girl showing lust for marriage | लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

googlenewsNext

पिंपरी: लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी तरुणाला अटक केली असून त्याला पोलीस ठोठडी सुनावण्यात आली. रुपीनगर आणि मोशी येथे २० मार्च ते २७ ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार घडला.

विठ्ठल मंकाळ पवार (वय २०, रा. ओटास्कीम निगडी), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलीने याप्रकरणी मंगळवारी (दि. २८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यातून तिला रुपीनगर येथे आणि एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली.

कोरोनाकाळात पुणे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलं झाली पोरकी

मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना तिच्या घरच्यांना संशय आला. त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने तपास करीत आहेत.

Web Title: sexual abuse teen girl showing lust for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.