पिंपरीत दारू पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 17:31 IST2022-06-26T17:25:14+5:302022-06-26T17:31:35+5:30

तरुणीचे फोटो त्याच्याकडे व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केले

Sexual abuse of a young woman by drinking alcohol in Pimpri He also threatened to make the video viral | पिंपरीत दारू पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

पिंपरीत दारू पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

पिंपरी : तरुणी काम करीत असलेल्या आयटी कंपनीतील सिनियर तरुणाने तिला घरी नेले. त्यानंतर तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचे फोटो असल्याचे सांगून पुन्हा लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार ६ जून आणि १० जून रोजी रात्री बावधन येथे घडला. अभिनव दिलीपकुमार शांडेल्य (वय ३१, रा. बावधन. मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित तरुणीने शनिवारी (दि. २५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एका आयटी कंपनीत काम करत होते. आरोपी हा कंपनीत फिर्यादी तरुणीचा सिनियर असून, कंपनीत काम करताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला त्याच्या घरी नेले. तिथे तरुणीला दारू पाजून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणीचे फोटो त्याच्याकडे असून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा फोन करून घरी बोलावून घेतले. त्या दिवशी देखील आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने तरुणीला पुन्हा फोन करून घरी बोलावले. मात्र तरुणीने थेट पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Sexual abuse of a young woman by drinking alcohol in Pimpri He also threatened to make the video viral