पुष्पा पिक्चर दाखविण्याचे सांगून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:47 IST2022-05-18T15:45:46+5:302022-05-18T15:47:13+5:30
हिंजवडीमधील धक्कादायक प्रकार

पुष्पा पिक्चर दाखविण्याचे सांगून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पिंपरी : पुष्पा पिक्चर दाखवितो, असे सांगून चिल्लर पैसे देऊन अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. अत्याचाराचा हा प्रकार मंगळवारी (दि. १७) दुपारी बारा ते एक या कालावधीत हिंजवडी येथे घडला.
अजितकुमार राजू पासवाान (वय ३०, रा. हिंजवडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पीडित अल्पवयीन मुलाला घेऊन कामाला आली होती. त्यावेळी अजितकुमार पासवान याने पीडित मुलाजवळ आला. तुला पुष्पा पिक्चर दाखवितो, असे म्हणून पासवान याने मुलाला बिल्डिंगमध्ये घेऊन गेला.
तेथे त्याला चिल्लर पैसे दिले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.