खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ५ महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:10 IST2021-06-11T17:10:02+5:302021-06-11T17:10:14+5:30

आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

Sex racket exposed in lodge in Alandi phata ; 5 women released | खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ५ महिलांची सुटका

खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ५ महिलांची सुटका

पिंपरी : खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून, वेश्याव्यवसायातील पाच महिलांची सुटका केली आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
लॉजचालक सतीश कुमार शेट्टी (वय ४१ रा. ठाणे), लॉजमॅनेजर सतीश गौडा (वय ३५, रा. साई पॅलेस लॉज, आळंदी फाटा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे फौजदार प्रदीपसिंग सिसोदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

-----

Web Title: Sex racket exposed in lodge in Alandi phata ; 5 women released