सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून ; आरोपीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:45 IST2019-01-22T15:15:14+5:302019-01-22T15:45:15+5:30
सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली आहे.

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून ; आरोपीची आत्महत्या
पिंपरी : सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारानंतर काही वेळेतच आरोपीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सीएमई दापोडी हद्दीत मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षाच्या मुलीवर आरोपीने अत्याचार केला. या प्रकारची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संबांधित आरोपीने काही तासाच्या अवधीत गळफास घेऊन आत्महत्या केली.विजय बहादूर यादव (वय 25, मूळचा रहिवासी उत्तरप्रदेश गाझियाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सीएमइ कॅन्टीनमध्ये वेटरचे काम करीत होता. याच परिसरात राहणाऱ्या पिडीत मुलीची आई सफाई कामगार म्हणून काम करते. सोमवारी सायंकाळी आरोपीची त्या महिलेशी भांडण झाले होते. या भांडणात ''बदला घेणार'' असे तो म्हणाला होता, त्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिलेचे पती सीएमइत वाहनचालक म्हणून काम करायचे. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आरोपीने महिलेला त्याच्याबरोबर लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यातून त्यांच्यात भांडण होत होते, असे महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलीची आई बेशुद्ध : पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या शवागराजवल मुलीची आई आली. मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा ऐकून तिला मानसिक धक्का बसला. ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने वायसीएममध्ये दाखल केले