पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक पॉझिटिव्ह; आत्तापर्यंत १६ पोलिसांना झाली बाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:32 IST2020-06-29T14:16:07+5:302020-06-29T14:32:45+5:30
१३ पोलीस कोरोनामुक्त झाले असून ११ पोलीस कर्तव्यावर झाले रुजू

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक पॉझिटिव्ह; आत्तापर्यंत १६ पोलिसांना झाली बाधा
पिंपरी : शहर पोलीस दलात आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या १६ झाली. त्यातील १३ पोलीस कोरोनामुक्त झाले असून ११ पोलीस कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देहूगाव येथून संत तुकाराम महाराज तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बसने पंढरपूर येथे रवाना झाल्या. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोबत रवाना होणाऱ्या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आळंदी नगरपरिषदेच्या वतीने काही पोलिसांची चाचणी झाली. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर यासह सुरक्षा साधनांचा वापर करावा, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.