महिला अंघोळीला गेल्याचे पाहून चोरट्याने पळवले लाखोंचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 12:53 IST2022-09-07T12:53:07+5:302022-09-07T12:53:24+5:30

पिंपरी : महिला अंघोळीला गेली आहे, याचा फायदा घेत घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने तब्बल एक लाख २० हजार ...

Seeing that the woman had gone to bath, the thief stole jewelry worth lakhs | महिला अंघोळीला गेल्याचे पाहून चोरट्याने पळवले लाखोंचे दागिने

महिला अंघोळीला गेल्याचे पाहून चोरट्याने पळवले लाखोंचे दागिने

पिंपरी : महिला अंघोळीला गेली आहे, याचा फायदा घेत घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने तब्बल एक लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने पळवले. ही घटना सोमवारी (दि.५) भोसरी येथे सकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अंघोळीला गेली असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने सोफासेटवर ठेवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन पळ काढला. या पिशवीमध्ये फिर्यादीचे पाच तोळ्यांचे मनी, सोन्याची पोत असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Seeing that the woman had gone to bath, the thief stole jewelry worth lakhs