पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार! गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 12:35 IST2021-06-02T12:35:24+5:302021-06-02T12:35:32+5:30

दोघांमध्ये फेब्रुवारीत झाले होते भांडण

With a scythe attack on the youth out of prejudice! Attempt to kill with serious injuries | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार! गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार! गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देतुला खल्लास करून टाकतो, असे म्हणत शिवीगाळही केली

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सस्तेवाडी, मोशी येथे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.

सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड (वय २१, रा. भारत माता चौक, मोशी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षल बोराटे, सुरज महाजन (दोघेही रा. मोशी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि हर्षल बोराडे यांच्यात फेब्रुवारीमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून बोराडेने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तुला खल्लास करून टाकतो, असे म्हणून शिवीगाळही केली. तसेच गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: With a scythe attack on the youth out of prejudice! Attempt to kill with serious injuries