पडद्याचा झोपाळा करून खेळताना बसला गळफास; ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:19 IST2021-08-31T15:50:26+5:302021-08-31T16:19:33+5:30
पिंपरीच्या तळवडे येथे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

पडद्याचा झोपाळा करून खेळताना बसला गळफास; ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
पिंपरी : घरातील पडद्याचा झोपाळा करून खेळत असताना ओढणीचा गळफास बसून आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. रुपीनगर, तळवडे येथे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
सुमैय्या शफिल शेख (वय ८, रा. रुपीनगर, तळवडे), असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमय्याचे आईवडील खरेदी करण्यासाठी पिंपरी येथे गेले होते. त्यावेळी सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच होती. बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या.
त्यावेळी पडद्याचा झोपाळा करून खेळत असताना सुमैय्याला ओढणीचा गळफास बसला. ही बाब तिच्या बहिणींच्या निदर्शनास आली. सुमैय्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेख दाम्पत्यांना चार मुली असून सुमैय्या ही सर्वात लहान होती.