शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Maharashtra Election 2019: ....ही तर आपल्या विजयाची नांदी! राहुल कलाटे यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:43 PM

काम कमी आणि दिखावा जास्त असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची भिस्त केवळ स्टार प्रचारकांवर आहे...

ठळक मुद्देचिंचवड मतदारसंघात पदयात्रा, रोड शोवर भर

पिंपरी : काम कमी आणि दिखावा जास्त असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची भिस्त केवळ स्टार प्रचारकांवर आहे. मात्र, आपण केवळ नगरसेवक असतानाही जनतेत उतरून काम केल्यामुळे आपल्याला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, विरोधी उमेदवाराला घाम फोडला असून हीच आपल्या विजयाची नांदी आहे, असा दावा चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे. रविवारच्या  सुट्टीचे औचित्य साधून कलाटे यांनी दिवसभर  प्रचार केला. दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सकाळी नऊला रॅलीला सांगवी येथून सुरुवात झाली. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलखसह मतदारसंघाच्या विविध भागात ही रॅली काढली. रॅलीचे ठिकठिकाणी फटाके फोडून जंगी स्वागत केले. अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विकासाची चाहूल फक्त राहुल, बॅटला मतदान करा, असे आवाहन कार्यकर्ते करीत होते. कलाटे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम, शास्ती कर, रिंगरोडचा प्रश्न सुटण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. सामान्यांमध्ये मिसळून काम करणाºया, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करणाºया नेतृत्वाची मतदारसंघाला गरज आहे. ही गरज आपण पूर्ण करणार आहोत. करदात्यांच्या पैशांची अक्षरश: लूट सुरू आहे. नव्यानेच विकसित केलेल्या डायनोसोर उद्यानाचे मिरॅकल गार्डन सुरू करण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा डायनासोर माजला आहे. जनता यावेळी या डायनासोरला धडा शिकविणार आहे.’’कलाटे म्हणाले, ‘‘राज्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघांपैकी एक असलेल्या चिंचवड मतदारसंघात उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. सजग व सुसंस्कृत असा येथील मतदार आहे. परंतु, कमी शिक्षण घेतलेले मतदारसंघाचे नेतृत्व करीत असल्याने विकासाचे व्हिजन नाही. परिणामी, एकीकडे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे नागरीकरण वाढत असताना बकालपणा वाढत आहे. काळानुरूप मतदारसंघातील विकासाचे प्रश्नही बदलत आहेत. हे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्या सारख्या उच्चशिक्षित पदवीधर उमेदवाराची गरज आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण