बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 14:47 IST2018-12-01T14:45:08+5:302018-12-01T14:47:20+5:30

स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौऱ्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. ‘‘शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहे, अशी भूमिका दोघांनी घेतली आहे.

ruling party and opposition both are supporting Barcelona visit | बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन

बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौऱ्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. ‘‘शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहे, अशी भूमिका दोघांनी घेतली आहे. ‘बार्सिलोना दौऱ्यातून नागरिकांच्या साह्याने शहराचे सुयोग्य नियोजन, सक्षम वाहतूकसेवा, मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार विकास आराखड्याच्या भविष्यातील नियोजनात त्याचा उपयोग केला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. ‘दौऱ्यातील चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून स्मार्ट शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

    स्पेनमधील बार्सिलोना येथे स्मार्ट सिटी काँग्रेसचे आयोजन केले होते. त्यासाठी स्मार्ट सिटीचे महापौर राहूल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, सदस्य प्रमोद कुटे, सचिन चिखले, उपकार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील आदी सहभागी झाले होते. तर आमदार लक्ष्मण जगताप स्वर्खाने या दौऱ्यात सहभागी झाले होते. या दौऱ्यात स्मार्ट सिटी शिवाय बांधकाम व्यावसायिकही सहभागी झाले होते. त्यामुळे स्पेन दौरा, त्यावरील खर्च, आयुक्तांचा सेल्फी यावर जोरदार टीका झाली होती. तर काँग्रेसने अहवाल सादर करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषद झाली. यावेळी महापौर, आयुक्त, पक्षनेते, विरोधीपक्षनेते उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी दौºयाचे समर्थन केले.

1) दौऱ्यांवर उधळपट्टी योग्य आहे का?
पक्षनेते -दौरे करणे आवश्यक आहेत. त्यातून विकासाची दृष्टी मिळते. आपल्यापेक्षा अन्य शहरात काय चांगले आहे, चांगल्या गोष्टींचे अनुकरण करता येते. त्यातून उधळपट्टी कशी काय?

विरोधीपक्षनेते- स्मार्ट सिटीच्या विकासासाठी बार्सिलोना दौरा पूरक आहे. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी आपणास मिळणार आहेत. त्यामुळे या दौºयामुळे उधळपट्टी होत नाही.
प्रशासन- शहराचा सर्वांगिण विकास साधायचा असल्यास दौरा करणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टी पाहायला हव्यात. बार्सिलोना दाैऱ्यातून शहर विकासाची दृष्टी मिळते.

२) खासगी की शासकीय, बांधकाम व्यावसायिक कसे?
पक्षनेते -दौरा शासकीय होता. बांधकाम व्यावसायिक आमच्याबरोबर नव्हते. त्या ठिकाणी ऐनवेळी भेट झाली.

विरोधीपक्षनेते-अनाठायी दौºयास आमचा विरोध असतो. दौरा हा स्मार्ट सिटी संचालकांचा होता. म्हणून सहभागी. त्यास शासनाची परवानगी होती

प्रशासन-स्मार्ट सिटी काँग्रेसकडून निमंत्रण होते. तसेच शासनाचीही परवानगी घेतली होती. दौरा हा शासकीयच.


३) अहवालाचे काय?
पक्षनेते-अहवाल देण्यापेक्षा कृतीतून आपण स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करू. बार्सिलोतील चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करू.
विरोधीपक्षनेते-स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करू. लेखोजोखा मांडला आहे.
प्रशासन -बार्सिलोना दौºयाची माहिती एकत्रित केली आहे. धोरण राबविताना त्या माहिती आणि सूचनांचा विचार करू.

आकस्मिक खर्च
दहा दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी दीड लाख खर्च येतो. स्पेन दौऱ्यासाठी एका व्यक्तीला तीन ते साडेतीन लाख खर्च आला आहे, ही उधळपट्टी आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्त म्हणाले, ‘‘स्पेन दौऱ्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. अभ्यास दौरे हे आकस्मिक किंवा प्रासंगिक असतात.
 

Web Title: ruling party and opposition both are supporting Barcelona visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.