लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यावर दरोडा; पती आणि पत्नीचे हात पाय बांधून लुटले ६७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:53 AM2021-06-17T11:53:18+5:302021-06-17T11:54:58+5:30

इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले

Robbery at doctor's bungalow in Lonavla | लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यावर दरोडा; पती आणि पत्नीचे हात पाय बांधून लुटले ६७ लाख

लोणावळ्यातील डाॅक्टरच्या बंगल्यावर दरोडा; पती आणि पत्नीचे हात पाय बांधून लुटले ६७ लाख

Next
ठळक मुद्देसाधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरून फरार झाले.

लोणावळा: लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये ५० लाख रुपये रोख व १६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा साधारण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला आहे.

गुरुवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले. तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावली. त्यांचे हात पाय बांधून घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरून फरार झाले. 

घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

Web Title: Robbery at doctor's bungalow in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app