शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

आंदर मावळातील पारीठेवाडी साकव पुलाचा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 4:09 PM

पारीठेवाडी येथील साकव पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचल्याने येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

ठळक मुद्दे नाला ओढ्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने २०१६-१७ मध्ये येथे साकव पूल मंजूर

कामशेत : आंदर मावळातील कुणे, अनसुटे, पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मेटलवाडी, गोंटेवाडी, आडारवाडी, सावळा आदि आदिवासी गावांना जोडणारा पारीठेवाडी येथील साकव पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचल्याने येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. दोन्ही बाजूला झालेल्या चिखलात दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. तर चारचाकी वाहने पुलाच्या सुरुवातीच्या बाजूला आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. येथील आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना चालणे अवघड झाले आहे. पुलाच्या पुढे शासकीय आश्रम शाळा माळेगाव आणि भैरवनाथ माध्यमिक विद्यालय माळेगाव या दोन विद्यालय असून विद्यार्थ्यांना येथून प्रवास करणे अवघड झाले आहे.आंदर मावळातील किवळे ते सावळा या अठरा किलोमीटरचा रस्ता ग्रामसडक योजने टप्पा क्र. १ अंतर्गत २०१४ साली नोव्हेंबर मध्ये सुरुवात झाली. त्याअंतर्गत रस्त्याचे पूर्णपणे नुतनीकरण करण्यात आले. पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होता. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली गावे हि सर्व आदिवासी वस्तीची असल्याने केंद्रीय आदिवासी निधी अंतर्गत या रस्त्याच्या कामाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे  सुरुवात झाली, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी दिली.या परिसरातील पारीठेवाडी इंगळून ग्रामपंचायतीच्यामध्ये कुणे अनसुटे भागातील नाला ओढ्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने २०१६-१७ मध्ये येथे साकव पूल मंजूर झाला. सदरचे काम वेळेत होऊ न शकल्याने तसेच पुलाचे काम पूर्ण झाले मात्र पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण करणे गरजेचे असताना ते केले गेले नाही. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूला मातीच्या भरावाचा रस्ता केल्याने ऐन पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन वाहतुकीस अडथला निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील चिखलाचा रस्ता खचला असून पादचारी पाय घसरून पडत आहेत. तर दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. चारचाकी वाहने येथून प्रवास करताना खड्यांमध्ये आदळून त्यांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :kamshetकामशेतmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड