किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:38 IST2018-09-01T17:37:01+5:302018-09-01T17:38:52+5:30

डंपर व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा  मृत्यू झाला असून अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

road accident at Dehu road : One killed and two injured | किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

किवळे : किवळे -देहूरोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर मुकाई चौकाजवळ असणाऱ्या मुकाई मंदिरासमोर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास डंपर व दुचाकी यांच्या अपघातात  दुचाकीवरील एका युवकाचा  मृत्यू झाला असून अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले असून  जखमींवर देहूरोड येथील एका  खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

                 रोहित दिलीप जाधव  (वय 18  रा. मुकाई चौक , किवळे  पुणे ) या  युवकाचा अपघातात मृत्यू झाला असून  सुरज शंकर धोत्रे  ( वय 17  व साहिल रंगरेश  (वय 15  दोघे रा. मुकाई चौक , किवळे  पुणे )  हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक  माहितीनुसार शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास किवळे -विकासनगर -देहूरोड रस्त्यावर डंपर व  दुचाकी यांचा अपघात  गंभीर जखमी झालेल्या तिघांना देहूरोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. यातील रोहीत जाधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सूरज व साहिल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .

 

Web Title: road accident at Dehu road : One killed and two injured