वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:01 IST2024-12-19T12:59:24+5:302024-12-19T13:01:29+5:30

६६ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात

Recruitment dose for ten departments of YCM | वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागी वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून, येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने उपचारामध्ये अडथळे येतात. त्यामुळे रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मेडिसीन विभागामध्ये १२, स्त्रीरोग ८, न्यूरोसर्जरी २, डायलिसीस २, बालरोग आयसीयू ३, इमर्जन्सी वॉर्ड २, आयसीयू १८, उरोरोग २, क्ष किरण कक्ष ४, दंतरोग ३ असे ५६ कनिष्ठ निवासी डॉक्टर भरण्यात येणार आहे. तर सीएमओ विभागात ५, शवविच्छेदन ३ आणि रक्तपेढीमध्ये २ अशा १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यांना दरमहा ७५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

दरम्यान, अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही पातळीवर अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

Web Title: Recruitment dose for ten departments of YCM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.