कंपनीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; चिखलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:40 IST2021-04-01T14:40:16+5:302021-04-01T14:40:45+5:30

महिलेच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Rape of a women under the pretext of getting a job in a company | कंपनीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; चिखलीत गुन्हा दाखल

कंपनीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; चिखलीत गुन्हा दाखल

पिंपरी : कंपनीत काम मिळवून देतो असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. तसेच तिच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपीनगर तळवडे ठिकाणी मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.

पीडित ४० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जनार्दन धुळगुंडे (रा. तळवडे), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांमध्ये माझी ओळख आहे, कंपनीत काम मिळवून देतो, असे आरोपीने आमिष दाखवले. पत्नीला घटस्फोट देऊन सर्व सोय करतो, असे सांगून फिर्यादीचा त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच्या चारचाकी वाहनातून अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून विश्वासघात करून फसवणूक केली. तसेच फिर्यादीचे शारीरिक शोषण करण्याच्या इराद्याने वारंवार त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Rape of a women under the pretext of getting a job in a company