Pune Crime: मुलीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर केला वारंवार बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 14:27 IST2022-01-15T14:23:16+5:302022-01-15T14:27:05+5:30
या प्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

Pune Crime: मुलीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर केला वारंवार बलात्कार
पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले. महिलेने विरोध केला असता तिच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. तळेगाव दाभाडे येथे २०१८ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. वसंत बबन भोगसे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पीडित फिर्यादी महिला तिच्या मुलीसह राहात असताना आरोपीसोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. फिर्यादी महिलेने विरोध केला असता त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शरद शिपणे तपास करीत आहेत.