लहानपणापासून ओळख असलेल्या तरुणाचा तरुणीवर बलात्कार; मारहाण करून लग्नास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 11:27 IST2022-04-11T11:27:14+5:302022-04-11T11:27:48+5:30

२३ वर्षीय तरुणीची पोलिसांत फिर्याद

rape of a young woman by a young man known since childhood bhosari | लहानपणापासून ओळख असलेल्या तरुणाचा तरुणीवर बलात्कार; मारहाण करून लग्नास नकार

लहानपणापासून ओळख असलेल्या तरुणाचा तरुणीवर बलात्कार; मारहाण करून लग्नास नकार

पिंपरी : लहानपणापासून ओळख असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करून लग्नास नकार दिला. बलात्कार प्रकरणी तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चऱ्होली, भोसरी व इतर ठिकाणी २८ फेब्रुवारी २०२० ते १६ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

पीडित २३ वर्षीय तरुणीने या प्रकरणी रविवारी (दि. १०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकास सुरेश साके (वय २८, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीच्या नात्यातील असून तो लहानपणापासून फिर्यादीच्या ओळखीचा आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीशी शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करायला नकार दिला. तसेच फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. 

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार भोसरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी दिघी पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.

Web Title: rape of a young woman by a young man known since childhood bhosari