Pimpri Chinchwad: कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार; नराधमाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:22 IST2022-05-24T16:21:26+5:302022-05-24T16:22:48+5:30

कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले होते

Rape by ingesting narcotics in cold drinks his taken into custody | Pimpri Chinchwad: कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार; नराधमाला घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad: कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार; नराधमाला घेतले ताब्यात

पिंपरी : कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी ( दि. २३ ) दुपारी १ ते ५ या कालावधीत मारूंजी कोलते पाटील, ता मुळशी येथे घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने गुरूवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम विनायक बने ( वय१९ ) रा. रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांना म्हणाला की, मला तुझाशी काही बोलायचे आहे. यानंतर आरोपीने फिर्यादी यांना गाडीवर बसऊन मारूंजी कोलते पाटील येथील राहत्या घरी घेऊन गेला. त्यानंतर कोल्ड्रीक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले. फिर्यादी यांच्या इच्छेविरूध्द शारीरीक संबंध ठेवले. त्यांनतर फिर्यादी यांना घरातून जाण्यास मज्जाव केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Rape by ingesting narcotics in cold drinks his taken into custody