Pimpri Chinchwad: चिखलीत बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:20 IST2023-07-31T12:17:50+5:302023-07-31T12:20:01+5:30
शनिवारी (दि. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली...

Pimpri Chinchwad: चिखलीत बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर छापा
पिंपरी : बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर चिखली पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे स्फोटक पदार्थ पोलिसांनी जप्त केले. चिखली येथील सोनवणे वस्ती येथे पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी (दि. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली.
विक्रांत राज देशमुख (वय ३६, रा. कसबा पेठ, पुणे), संतोष तायप्पा शिवशरण (वय ४४, रा. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार चंद्रशेखर चोरगे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीमध्ये फटाके बनविण्यासाठी लागणारी स्फोटके विनापरवाना बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ५०० रुपये किमतीचे स्फोटके आणि केमिकल जप्त केले.