पिंपरी : अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणामुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही घरातील, महिला, मुली आणि ज्येष्ठ देखील सहभागी झाले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
भोसरीतील खंडे वस्ती येथील कालीमाता मंदिर मागे गुरुवारी (दि १) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. छाया देवराम गायकवाड (वय ३०, रा. कालीमता मंदिरा मागे, भोसरी) यांनी दिलेल्या फर्यादी नुसार लहान मुलांच्या भांडणावरून सोळा वर्षाच्या मुलासह पाच जणांनी शिवीगाळ करीत आई जिजाबाई (वय६०) आणि चौदा वर्षाच्या मुलीला मारहाण केली. या प्रकरणी शर्मा कुटुंबातील सोळा वर्षांचा मुलगा, बबली, अंजली, प्रियांका, गोविंद आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रियांका प्रावीण तिरकर (वय २६, बुद्ध विहाराजवळ, खंडे वस्ती, भोसरी) यांनी आठ आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. छाया अप्पा गायकवाड (वय३८), पूजा, शारदा, छायाची आई, अप्पा गायकवाड, सुनील, आरती, अंजली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बहिणीच्या मुलाची आरोपी गायकवाड यांच्या मुलाशी भांडणे झाली होती. त्यावरून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Quarrels between two families over child abuse; Conflicting cases filed in Bhosari
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.