पिंपरीतही 'पुणेरी पाट्यां'ची हवा : लोकमत आयोजित प्रदर्शन उत्साहात सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:37 PM2018-07-08T16:37:48+5:302018-07-08T16:38:01+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती . 

'Puneri Patya' exhibition started in Pimpri Chinchawad, organized by Lokmat | पिंपरीतही 'पुणेरी पाट्यां'ची हवा : लोकमत आयोजित प्रदर्शन उत्साहात सुरु 

पिंपरीतही 'पुणेरी पाट्यां'ची हवा : लोकमत आयोजित प्रदर्शन उत्साहात सुरु 

googlenewsNext

पिंपरी चिंचवड :लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास चिंचवडमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती .  

    प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.या वेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे शिवसेनेचे गटनेते व संयोजक राहुल कलाटे , बांधकाम व्यावसायिक आरडी देशपांडे केआरए ज्वेलर्सचे अतुल  आष्टीकर आकाश शेळके , राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजचे प्रमुख अजय सोळुंखे,  कमाल सोळुंके मेन्स अभिनवचे अजित जैन ,खत्री बंधू पॉट आईस्क्रीम मस्तानी संस्थेचे गिरीश  खत्री आदी उपस्थित होते 

     पुणेकरांच्या पुणेरी बाण्यासोबत मिश्किल पुणेरी पाट्या ही सुद्धा एक खासियत आहेच. या पाट्यांमधून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’,‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, अशा खवचट पुणेकरांच्या तैलबुद्धीला एकाच छताखाली पाहावयास मिळणे म्हणजे निव्वळ दुग्धशर्करा योगच!  

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवड येथेही

KRA आयोजित व मेन्स अवेन्यूच्या सहयोगाने को पावर्ड बाय राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज. आईस्क्रीम पार्टनर खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी, आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि., व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन 

पुणेरी पाट्यांचे भव्य प्रदर्शन 

रविवार ८ जुलै व सोमवार ९ जुलै      

गंधर्व हॉल, सर्वे नं. १/१, गोखले वृंदावन, चापेकर चौकाजवळ,

चिंचवडगाव, पुणे 

प्रवेश विनामूल्य

Web Title: 'Puneri Patya' exhibition started in Pimpri Chinchawad, organized by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.