तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:51 IST2025-08-08T18:50:11+5:302025-08-08T18:51:09+5:30

चाकण येथील सततची वाहतूक कोंडी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या समस्येचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले होते

pune news you have common sense, we are fools, Ajit Pawar got angry; what exactly happened? | तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ?

तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ?

पुणे - चाकण येथील सततची वाहतूक कोंडी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या समस्येचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) पहाटे चाकणच्या तळेगाव आणि आंबेठाण चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांसोबत चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक महामार्गाने कारने येऊन तळेगाव चौकात, आंबेठाण चौकात औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची व परिसराची पाहणी केली. यानंतर खराबवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका खासगी कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथे भाषण सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर यांनी, “अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आहेत. आमचे जीव जात आहेत, असे सांगितले.



त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी तुलाच अक्कल आहे का, आम्ही बिनडोक आहोत का, आम्हीसुद्धा आठ वेळा निवडून आलो आहोत. या शहाण्याला काही कळत नाही. आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं. सकाळी साडेचारला उठून आम्ही कामं केली आहेत. या परिसराच्या विकासासाठी तीनशे, चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. जर आम्ही अतिक्रमणे काढली तर पुन्हा तुमची नाराजी सोसावी लागते, अशा शब्दांत पवार यांनी संबंधिताला खडसावले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे.  

Web Title: pune news you have common sense, we are fools, Ajit Pawar got angry; what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.