वयाचे बनावट दाखले देऊन लग्न; नवरदेवासह दोघांच्या विरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:50 IST2025-12-21T15:50:18+5:302025-12-21T15:50:42+5:30
- लग्नासाठी त्याचे वय २१ वर्षे पूर्ण नसताना त्याचा शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड हे बनावट तयार वय २१ वर्षे पूर्ण असल्याचे भासवले.

वयाचे बनावट दाखले देऊन लग्न; नवरदेवासह दोघांच्या विरोधात गुन्हा
पिंपरी : शाळा सोडल्याचा बनावट दाखला व आधारकार्ड तयार करून २१ वर्षे पूर्ण असल्याचे भासवून लग्न केले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आळंदी येथे अलंकापुरी मंगल कार्यालयात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा प्रकार घडला.
इंदापूर तालुक्यातील ४८ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रमोद अभिमन्यू केकाण आणि विशाल सुभाष डोईफोडे (दोघे रा. डाळज नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बीएनएस ३१८ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६चे कलम १० व ११ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद केकाण याने लग्नासाठी त्याचे वय २१ वर्षे पूर्ण नसताना त्याचा शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड हे बनावट तयार वय २१ वर्षे पूर्ण असल्याचे भासवले. ते बनावट दाखले आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात देऊन फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्न केले. यातून प्रमोद केकाण आणि विशाल डोईफोडे यांनी फिर्यादी यांची मुलगी व मंगल कार्यालयाचे मालक कानिफनाथ राऊत यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.