राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:47 IST2025-07-31T14:47:08+5:302025-07-31T14:47:42+5:30

- गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे.

pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पिंपरी - तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग)चे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्यावर अज्ञात महिलेने जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे.

गरुड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मी समाजासाठी व इनाम जमीन प्रकरणातील जुन्या केसेस पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यामुळे रागातून माझ्या राहत्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला.  ही घटना मंगळवार, २९ जुलैला रात्री १० ते १०.३० च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला काष्ठ्या रंगाची साडी परिधान करून घराच्या गेटमध्ये येते, व हळदी-कुंकू लावलेला लिंबू व इतर वस्तू गाडीवर फेकून पळून जाते, असे स्पष्ट दिसून येते.



सीसीटीव्हीमधून संबंधित महिलेची ओळख कमल पांडुरंग भेगडे अशी पटली असून, ती जीवन पांडुरंग भेगडे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची आई आहे. जीवन भेगडे याने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा भोगली असल्याचेही गरुड यांनी नमूद केले आहे. सदर प्रकारामुळे सुखास गरुड यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाकडे तत्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

तसेच कमल भेगडे व तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा अशीही विनंती अर्जात करण्यात आली आहे. भविष्यात माझ्या किंवा कुटुंबियांच्या जीवाला काही झाले, तर कमल भेगडे व तिच्या कुटुंबास जबाबदार धरावे असेही गरुड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.