Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:13 IST2026-04-12T18:12:26+5:302026-04-12T18:13:00+5:30

Pune Crime - सोशल मीडियावर ‘लाईक्स’साठी जीवाशी खेळ; वाकड पोलिसांची तात्काळ कारवाई, तरुणाची लेखी माफी

Pune Crime: First 'Thar' caused a stir, then joined hands Police slap a stuntman in Pimpri-Chinchwad | Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

पिंपरी-चिंचवड -  सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या ‘थार’ गाडीने भररस्त्यात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. मात्र, त्याचा हा ‘स्वॅग’ वाकड पोलिसांसमोर फार काळ टिकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने केवळ काही सेकंदांची रील बनवण्यासाठी गजबजलेल्या रस्त्यावर भरधाव वेगात वाहन चालवले. एवढेच नव्हे, तर त्याने थार गाडी चक्क फूटपाथवर चढवून रॅश ड्रायव्हिंग केले. या प्रकारामुळे पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

ही संपूर्ण स्टंटबाजी त्याने अभिमानाने सोशल मीडियावर पोस्ट केली. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि पोलिसांनीही तात्काळ याची दखल घेतली. वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास, सोशल मीडिया अकाउंट आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.



पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ‘रील स्टार’चा सर्व तोरा उतरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष त्याने आपली चूक मान्य करत हात जोडून माफी मागितली. “पुन्हा कधीही अशा प्रकारची स्टंटबाजी करणार नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन,” असे लेखी आश्वासनही त्याने दिले. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित तरुणावर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी तरुणांना इशारा देत म्हटले आहे की, सोशल मीडियासाठी कायद्याशी खेळ केल्यास कठोर कारवाई अटळ आहे. या तडकाफडकी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा प्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title : थार स्टंट पड़ा भारी: पिंपरी-चिंचवड़ में युवक ने मांगी माफी

Web Summary : सोशल मीडिया पर प्रसिद्धि के लिए पिंपरी-चिंचवड़ के एक युवक का थार स्टंट विफल रहा। वीडियो वायरल होने के बाद वाकड पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। उसने माफी मांगी और यातायात नियमों का पालन करने का वादा किया। पुलिस ने सोशल मीडिया स्टंट के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Thar Stunt Gone Wrong: Pimpri-Chinchwad Youth Apologizes After Police Action

Web Summary : A Pimpri-Chinchwad youth's dangerous Thar stunt for social media fame backfired. Wakad police swiftly arrested him after the video went viral. He apologized and promised to follow traffic rules. Police warned against social media stunts.