Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:30 IST2025-07-31T13:30:28+5:302025-07-31T13:30:52+5:30

- याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  

Pune Crime: Father beats up son in society for not inviting him to party | Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

पिंपरी : गहुंजे येथील उच्चभू सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सोसायटीमध्ये किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये घडली. याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता अंकुश तिवारी (४५, रा. बाणेररोड, पुणे) यांच्यावर शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर भेगडे याचा मुलगा आदित्य भेगडे आणि त्याचे काही मित्र क्लब हाऊसमध्ये खेळत होते. त्यावेळी पार्टीमध्ये बोलावण्याच्या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला.

ही बाब किशोर भेगडेच्या लक्षात येताच त्याने संतापाच्या भरात मुलाच्या मित्रांना गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये किशोर भेगडेने एका १५ वर्षीय मुलाच्या पोटात मारलेला जोरदार गुद्दा दिसत आहे. घटनेनंतर फिर्यादी यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार (जीवे मारण्याचा प्रयत्न) किशोर भेगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Pune Crime: Father beats up son in society for not inviting him to party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.