Pimpri Chinchwad: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 21:55 IST2023-08-11T21:52:57+5:302023-08-11T21:55:01+5:30
दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय...

Pimpri Chinchwad: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १०) पिंपळे सौदागर येथे पोलिसांनी केली. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक वाहतूक कक्ष पोलिस हवालदार सुनील जगन्नाथ शिरसाट (वय ४४) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ही स्पा सेंटरच्या नावाखाली दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत होती. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली उपजीविका चालवत होती.