लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, महिलेची सुटका
By नारायण बडगुजर | Updated: March 13, 2024 17:08 IST2024-03-13T17:06:26+5:302024-03-13T17:08:09+5:30
लाॅजचा व्यवस्थापक महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेत होते

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, महिलेची सुटका
पिंपरी : लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोघांना अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने आळंदी येथे आळंदी-मरकळ रस्त्यावर सोमवारी (दि. ११) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई केली.
दिनेश नागेश्वर यादव (४२, रा. आळंदी) आणि विजय शिवचरण यादव (३०. सध्या रा. शेतकरी मळा ॲण्ड लाॅजिंग, मूळ रा. गया, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १२) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅजचा चालक दिनेश यादव आणि लाॅजचा व्यवस्थापक विजय या दोघांनी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवले. तिच्याकडून बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई केली. यात पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.