शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ्यात शांततेत मतदान

By admin | Updated: August 20, 2015 02:31 IST

खडकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरमतदान बुधवारी शांततेत पार पडले. नाकाबंदी, चित्रीकरण, मतदान केंद्र व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

वडगाव मावळ : खडकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरमतदान बुधवारी शांततेत पार पडले. नाकाबंदी, चित्रीकरण, मतदान केंद्र व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदारांनी लांबलचक रांगा लावून उत्स्फूर्तपणे मतदान केले. शेवटच्या एक तासात मतदान केंद्रावर शुकशुकाट झाला होता.खडकाळा ग्रामपंचायत निवडणूक मतदान सुरू असताना दि. ४ आॅगस्टला मनसे तालुकाध्यक्ष मंगेश वाळुंज यांच्या खुनाची घटना घडल्याने जमावाने ७ मतदान केंद्रांची तोडफोड करून मतदान बंद पाडले. या घटनेमुळे राज्य निवडणूक आयोगाने खडकाळा अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित करून ग्रामपंचायतीचे फेरमतदान बुधवारी घेतले. प्रत्येक मतदान केंद्राला तहसीलदार शरद पाटील यांनी भेट दिली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेतमध्ये बुधवार व गुरुवार या दोन दिवस जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात चित्रीकरण करण्यात येत होते. नाकाबंदी असल्याने मतदान केंद्रात बाहेरील नागरिकांना प्रवेश नसल्याने गर्दी झाली नाही. साध्या वेशातून पोलीस मतदान केंद्र व परिसरात संशयित व्यक्ती व वस्तूंवर करडी नजर ठेवत होते. कामशेत बाजारपेठेत मतदान सुरू असल्याने बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. गजबजलेले रस्ते व चौक ओस पडले होते. तुरळक गर्दी दिसत होती. कामशेत येथे कडक बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. मंगळवारी शेकडो पोलीस जवानानी पथसंचलन केल्याने नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह निर्माण झाल्याचे नागरिक सांगत होते. या वेळी पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विनायक ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजय जाधव, वसंत बाबर, प्रदीप काळ यांच्यासह १० पोलीस उपनिरीक्षक, ७५ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे ३० जवान तैनात केले होते. (वार्ताहर)