पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:23 IST2025-12-20T14:21:20+5:302025-12-20T14:23:12+5:30
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपाने दिले आहे. मुंबईत माजी नगरसेवक आणि २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला.
महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. १५ जानेवारीला मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. महापालिकेची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे
१) माजी महापौर उभाठा गटाचे नेते – संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे
४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – विनोद नढे
५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – प्रभाकर वाघेरे
६) माजी उपमहापौर – राजू मिसाळ
७) उभाठा गटाचे नगरसेवक – अमित गावडे
८) उभाठा गटाच्या नगरसेविका – मीनलताई यादव
९) रवी लांडगे
१०) माजी नगरसेवक – संजय नाना काटे
११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – आशाताई सूर्यवंशी
१२) प्रविण भालेकर
१३) जालिंदर बापु शिंदे
१४) सचिन सानप (स्वतः व पत्नी)
१५) दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
१६) सदगुरु कदम
१७) समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)
१८) डॉ. श्री सुहास कांबळे
१९) कुशाग्र कदम
२०) अशोक मगर
२१) नागेश गवळी
२२) प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.
२३) नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष.
२४) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर.
सर्व पिंपरी-चिंचवडकर मान्यवरांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत करतो. देव-देश-धर्म अन् संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये ’’विकासाभिमूख हिंदुत्वाच्या’’ पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. - महेश लांडगे, आमदार.
मुंबईत आज राष्टवादी आणि इतर पक्षातून भाजपात प्रवेश झाले आहेत. महापालिकेत सत्ता भाजपाची येणार आहे. -शंकर जगताप, आमदार
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या निमित्त शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष