प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप

By Admin | Updated: October 13, 2016 01:56 IST2016-10-13T01:56:20+5:302016-10-13T01:56:20+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला, असे आरोप-प्रत्यारोप

Political intervention in Prabhakarachi | प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप

प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला, असे आरोप-प्रत्यारोप सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये सुरू आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने यांच्याकडे तक्रार करण्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाची प्रभागरचना जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांपर्यंत प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा पोहोचला होता. निवडणूक कामात वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक ठरत आहे, असा आरोप मोढवे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political intervention in Prabhakarachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.