पिंपरी : निवडणुकीची मतमोजणी असल्याने शहरात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ११ ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने त्या ठिकाणी मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली जाईल. त्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना परिमंडल तीनच्या पोलीस उपायुक्तांनी दिल्या आहेत. पिंपरी, भोसरी, निगडी आणि चिंचवड परिसरात पोलिसांची जादा कुमक मागविली आहे. एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात आहेत. परिमंडल तीन हद्दीत सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.
मोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Updated: February 23, 2017 03:08 IST