पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 20:20 IST2019-11-26T20:19:48+5:302019-11-26T20:20:36+5:30

पार्कींगमध्ये जागा नाही दुसऱ्या पार्कींगमध्ये गाडी लावण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरुणाने पाेलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.

police officer were beaten by youth | पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराची मारहाण

पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराची मारहाण

पिंपरी : पार्किंगमध्ये जागा नाही, पुढच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करा, असे सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वार तरुणाने मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास आळंदीमधील पीसीएमसी चौकात घडली.

आळंदी पोलीस ठाण्यातील हवालदार बापूराव भीमराव नळकांडे यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माणिक संभाजी करत (वय २६, रा. आळंदी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बापूराव हे सोमवारी सकाळी आळंदीमधील पीसीएमसी चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी विनाक्रमांकाची मोटारसायकल भरधाव वेगात घेऊन माणिक करत तेथे आला. बापूराव यांनी दुचाकीस्वाराला पार्किंगमध्ये जागा नाही, पुढच्या पार्किंगमध्ये गाडी लाव, असे सांगितले. आरोपी माणिक याने बापूराव यांच्या पायावरून दुचाकी पुढे नेली. त्यावेळी पोलीस नाईक शिर्के यांनी दुचाकीस्वाराला पार्किंगसाठी जागा नसल्याचे समजावून सांगितले. यावरून आरोपी माणिक याने  बापूराव यांची गचंडी पकडून त्यांना मारहाण केली. यामध्ये बापूराव जखमी झाले.

Web Title: police officer were beaten by youth