पीएमपी बसची दुप्पट भाडेवाढ;प्रवाशांच्या खिशाला झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:31 IST2025-06-03T17:29:16+5:302025-06-03T17:31:47+5:30

- सीएनजी आणि डिझेलच्या किमती वाढल्याचा परिणाम; २०१४ नंतर आता वाढ झाल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

PMP bus fares doubled; passengers pockets hit Impact of increase in CNG and diesel prices | पीएमपी बसची दुप्पट भाडेवाढ;प्रवाशांच्या खिशाला झळ

पीएमपी बसची दुप्पट भाडेवाढ;प्रवाशांच्या खिशाला झळ

पिंपरी : पीएमपीएमएल प्रशासनाने बसभाड्यात दुपटीने वाढ केली आहे. आधी दोन किलोमीटरच्या टप्प्याला पाच रुपये भाडे होते. मात्र, आता पाच किलोमीटरचा टप्पा केला असून, त्यासाठी १० रुपये भाडे आकारले जाईल. रविवार, १ जूनपासून ही भाडेवाढ लागू झाली असून, मासिक व एक दिवसाच्या पासचेही दर वाढले आहेत. यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. सीएनजी व डिझेलच्या किमती वाढल्या असून, २०१४ नंतर आता भाडेवाढ केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बसच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. लांबच्या प्रवासासाठी दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, जवळच्या प्रवासासाठी तिकीटदर कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, निगडी व भोसरी येथील पीएमपी आगारातून ९६ मार्गांवर ३९१ बस धावत असून, त्यांच्या दररोज ४,३९२ फेऱ्या होतात. या आगारांतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बस जातात. नवीन भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

प्रमुख पीएमपी मार्ग - आधीचे भाडे - नवीन भाडे

पिंपरी - महाळुंगे - ३० - ६०
हिंजवडी - आळंदी - ४५ - ७०

चिखली - पुणे स्टेशन - ३५ - ५०
पिंपरीगाव - मार्केट यार्ड - ३५ - ६०

चिंचवडगाव - कात्रज - ३५ - ६०
भोसरी - हिंजवडी - ३० - ५०

भोसरी - कात्रज             - ३५ - ६०
भोसरी - हडपसर - ४० - ७०

भोसरी - पुणे स्टेशन - २५ - ४०
भोसरी - राजगुरूनगर - ४० - ६०

निगडी-लोणावळा - ६७ - ८२
निगडी - तळेगाव - २६ - ४१

निगडी - वडगाव - ३१ - ५१
निगडी - पुणे स्टेशन - ३० - ५०

निगडी - स्वारगेट - ३० - ५०
निगडी - पिंपरी - १० - २०

निगडी - कात्रज - ४० - ८०
निगडी - वाघोली - ३५ - ७०

निगडी - शिवाजीनगर - २५ - ४०
निगडी - महाळुंगे - २० - ४०

मुकाई चौक - मनपा - ३० - ५०
निगडी - नवलाख उंब्रे - ४६ - ७१

निगडी - देहूगाव - २० - ३०
निगडी - किवळे - १५ - ३०

चिंचवडगाव - पुणे मनपा - ३० - ४०
कमी झालेले बसभाडे

चिंचवडगाव-डांगे चौक : १० - ५
चिंचवडगाव-औंध हाॅस्पिटल : २० - १०

 
- शहरातून दररोज धावणाऱ्या बस - ३९१

- एकूण मार्ग (रुट) - ९६
- एकूण फेऱ्या - ४,३९२
 
मासिक पासचे दर असे राहतील...

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आधी मासिक पासचा (सर्व मार्ग) दर ९०० रुपये, तर पुणे महापालिका हद्दीसाठी १२०० रुपये होता. मात्र, आता १,५०० रुपयांच्या एकच पासमध्ये दोन्ही महापालिका समाविष्ट केल्या आहेत. दोन्ही महापालिका व ग्रामीण भागासाठी आधीचाच २,७०० रुपये दर ठेवला आहे. आधी एका दिवसाच्या पासचा दर पिंपरी-चिंचवडसाठी ४०, दोन्ही महापालिकांसाठी ५० रुपये तर दोन महापालिका व ग्रामीण भागासाठी ७० रुपये होता. मात्र, आता दोन महापालिका ७० व ग्रामीणसह १२० रुपये करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Web Title: PMP bus fares doubled; passengers pockets hit Impact of increase in CNG and diesel prices