गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; 'प्लेसमेंट मिळणार नाही' कारणास्तव संपवलं जीवन
By तेजस टवलारकर | Updated: July 15, 2022 20:33 IST2022-07-15T18:16:21+5:302022-07-15T20:33:54+5:30
सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारून संपवले जीवन

गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; 'प्लेसमेंट मिळणार नाही' कारणास्तव संपवलं जीवन
पिंपरी : इंजिनिअरिंग झालेल्या तरुणाने ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या केली. ही घटना
सुसगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाने इजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा संगणक अभियंता असून सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांचा चुलत भाऊ होता.
नोकरीसाठी ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने त्याने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (वय २१, रा. माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूम पाठीमागे, सुसगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे. घटनेचे माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्याने त्याला प्लेसमेंट होणार नाही या भीतीने सुसाइड केले असल्याचे नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.