पिंपरीत एका प्रवाशाला शस्त्राने जखमी करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:19 IST2021-06-07T18:18:59+5:302021-06-07T18:19:06+5:30

रिक्षातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

In Pimpri, a passenger was injured and robbed with a weapon | पिंपरीत एका प्रवाशाला शस्त्राने जखमी करून लुटले

पिंपरीत एका प्रवाशाला शस्त्राने जखमी करून लुटले

ठळक मुद्देआरोपींनी त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सॅग, असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला

पिंपरी : शस्त्राचा धाक दाखवून रिक्षातील प्रवाशाला लुटले. चिकन चौकाजवळ, स्पाईन रोड, निगडी येथे शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. वीरेंद्र अर्जुन सरोज (वय ४३, रा. निघोजे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज शुक्रवारी पहाटे स्पाईन रोड निगडी येथून तळवडेकडे एका रिक्षातून जात होते. चिकन चौकाच्या पुढे काही अंतरावर रिक्षा आली असता रिक्षातील तीन जणांनी सरोज यांना लोखंडी चाॅपर सारख्या हत्याराचा धाक दाखवून वार करून जखमी केले. आरोपींनी त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सॅग, असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: In Pimpri, a passenger was injured and robbed with a weapon