पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 18:34 IST2023-12-19T18:34:09+5:302023-12-19T18:34:24+5:30
शुक्रवारी (दि. २२) पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता

पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात गुरुवारी (दि. २१) पाणीपुरवठा बंद असणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई, आर ॲन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोनमेंन्ट बोर्ड, ओ.एप.डी.आर. या भागात गुरुवारी (दि.२१) पाणी पूरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी आठ ते रात्री ११ या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. २२) पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या तसेच वापरासाठीच्या पाण्याची तजवीज करून ठेवावी लागणार आहे.