शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

पिंपरी - चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:25 IST

रत्नागिरीतील पावसमध्ये ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनेसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह चार जणांना रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. आमदार बनसोडे यांच्या पीएला देखील पोलिसांनीअटक केल्याचे सांगण्यात येत आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ याच्या विररोधात निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.

आमदार अण्णा बनेसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळभोरनगर, चिंचवड येथे १२ मे रोजी ही घटना घडली होती. तसेच निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. बेकायदा जमाव जमवून मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणे तसेच अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणे, असे दोन वेगवेगळे गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांमध्ये सिद्धार्थ अण्णा बनसोडे आणि इतर काही आरोपी फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. मात्र दोन आठवड्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.

पहिली घटना आकुर्डी येथील एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांच्या कार्यालय येथे ११ मे २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात १२ मे २०२१ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धार्थ बनसोडे, बनसोडे यांचे पीए व इतर आठ जण (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कदम या एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात आरोपी आले. त्यांनी धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. कंपनीचे आयटी एक्झीक्यूटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण यांना ढकलून जखमी केले. त्यानंतर ऑफिस बंद करण्यास सांगून कदम व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

दुसऱ्या घटनेत तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी फिर्याद दिली. सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार बनसोडे आणि फिर्यादी यांचे फोनवरून संभाषण झाले. त्यावेळी पवार हे आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. पवार हे १२ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात असताना आमदार अण्णा बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने  त्यांचे अपहरण करून काळभोर नगर, चिंचवड येथे नेले. तेथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी पवार मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसMLAआमदारArrestअटक