भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; आमदार महेश लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रत्युत्तर

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 22, 2025 19:11 IST2025-06-22T19:09:56+5:302025-06-22T19:11:12+5:30

ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

pimpri chinchwad news Ajit pawar is the legacy of Bhosari MLA Spokesperson Umesh Patil's response to MLA Mahesh Landge criticism | भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; आमदार महेश लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रत्युत्तर

भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; आमदार महेश लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रत्युत्तर

पिंपरी : संतपीठाच्या कार्यक्रमात भाेसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अकलेचे दिवाळे काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी  पत्रकार परिषदेत केली. लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच असल्याचेही त्यांनी सुनावले.

शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील पक्ष कार्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेला अजित गव्हाणे, राहुल भाेसले, नाना काटे, शाम लांडे, पंकज भालेकर, डब्बू असवाणी, कविता आल्हाट, फजल शेख आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. १८) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पणासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली होती. ‘मी पैलवान आहे, काेणाला घाबरत नाही, काेणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायची सवयच आहे. शहरातील नागरिकांनी तुम्हाला सत्ता दिली नसती तर तुम्ही काय केले असते?’, असे ते म्हणाले होते.

या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रदेश प्रवक्ते पाटील म्हणाले की, शहर आणि परिसराला संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ज्यांनी आपल्याला राजकारणात आणले, त्यांच्यावर टीका करण्याचे ते व्यासपीठ हाेते का? त्या व्यासपीठावर काय बाेलावे, याचे भान आमदार लांडगे यांना राहिले नाही. तमाशाच्या फडात बाेलल्यासारखे स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढून त्यांनी प्रतिष्ठा कमी करून घेतली आहे. त्यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेली आहे.

Web Title: pimpri chinchwad news Ajit pawar is the legacy of Bhosari MLA Spokesperson Umesh Patil's response to MLA Mahesh Landge criticism