पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 18:15 IST2019-06-07T18:12:47+5:302019-06-07T18:15:23+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील साने चौकातील संपर्क कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड झाली...

Pimpri Chinchwad municipality opposition leader datta sane's office has broken unknown person | पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील साने चौकातील संपर्क कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड झाली. अज्ञातांनी ही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दत्ता साने यांनी याबाबत सांगितले, शुक्रवारी दुपारी तीन वाजतापर्यंत मी कार्यालयात होतो. कामानिमित्त बाहेर गेलो. त्यानंतर काही अज्ञातांनी वाहनांतून येऊन तोडफोड केली. यातील पाच ते सहा जण कार्यालयाबाहेर थांबले होते. तीन जणांनी कार्यालयात येऊन काचांची तोडफोड केली. या वेळी कार्यालयात कामावरील दोन मुली होत्या. या मुलींच्या अंगावरही या काचा उडाल्या. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आहेत. तोडफोड करून अज्ञातांनी पळ काढला. याबाबत मला माहिती मिळताच मी घटनास्थळी आलो.दरम्यान तोडफोड झाल्याची चर्चा वाºयासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही  कॅमेºयात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तोडफोड करणारे अनोळखी होते. त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Pimpri Chinchwad municipality opposition leader datta sane's office has broken unknown person