शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पिंपरी - चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 4:04 PM

तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली

ठळक मुद्देतपासात उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी

पुणे : न्यायालयाची दिशाभूल करून अंतरिम जामीन मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लांडगे यांनी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आईच्या आईचे (आजीचे)  निधन झाले असल्याचे सांगितले होते.

मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांची मावशी गेली आहे. त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली असल्याचा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी हेडाऊ यांनी लाडगेंचा जामीन फेटाळला.

होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदार जाहिरात ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन लांडगे यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

नितीन लांडगे यांनी आईच्या आईचे निधन झाले असल्याचे सांगून तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी लांडगे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी मेडिकल कारणास्तव पुन्हा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याला सहाय्यक सरकारी वकील अँड रमेश घोरपडे यांनी विरोध केला. फिर्यादीने लांडगे यांचे स्वीय सहाय्यक पिंगळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना ३ टक्क्याऐवजी २ टक्केप्रमाणे पैसे देण्याबाबत चर्चा करण्यात आली. लांडगे यांनी ‘ठीक आहे दो से करो, दोन ने करून टाका ओके’ असा आदेश दिला व त्यानुसार ६ फाईल्स च्या दोन टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार रूपयांची लाच शिपाई कांबळे यांनी स्वीकारली.

 लांडगे यांना जामीन मंजूर झाल्यास गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. तपासात उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. तसेच त्यांच्यात आणि अ़टक झालेले ५ आरोपी यांच्यात काही रँकेट आहे का? याबाबत तपास करणे आहे. लांडगे यांच्याविरूद्ध गुन्हयाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे बाकी आहे असा युक्तिवाद अँड घोरपडे यांनी न्यायालयात केला. लांडगे यांच्या वतीने अँड प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी देत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, उद्या (27) लांडगे यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPresidentराष्ट्राध्यक्षPoliceपोलिसArrestअटक