म्यूल अकाउंट हैंडलरसह दोघांना अटक; एक कोटी १२ लाखांची केली होती फसवणूक
By नारायण बडगुजर | Updated: February 27, 2025 10:00 IST2025-02-27T09:59:39+5:302025-02-27T10:00:45+5:30
सायबर पोलिसांनी या प्रकरणातील म्यूल अकाउंट हॅन्डलर आणि त्याच्या साथीदाराला मीरा-भाईंदर मधून अटक

म्यूल अकाउंट हैंडलरसह दोघांना अटक; एक कोटी १२ लाखांची केली होती फसवणूक
पिंपरी : सायबर गुन्हेगारांनी पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होतो, असे सांगून त्यांची १ कोटी १२ लाखांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणातील म्यूल अकाउंट हॅन्डलर आणि त्याच्या साथीदाराला मीरा-भाईंदर मधून अटक केली.
मितेश राजूभाई व्होरा (३४, अहमदाबाद), केपिन अजितकुमार मेहता (४१, अहमदाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मितेश हा गुजरातमधून म्यूल अकाउंट घेऊन केपिन याला पाठवत होता. केपिन हा फसवणुकीची रक्कम अशा म्यूल अकाउंटवर घेत होता.
जानेवारी २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व्यक्तीला संशयितानी वेगवेगळ्या कंपन्यांमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. संशयितांनी सुरुवातीला फिर्यादीकडून एक कोटी ३० लाख २३ हजार ५१५ रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास बसण्यासाठी त्यांना काही रक्कम परत केली. मात्र एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात संशयित हे अहमदाबाद गुजरात येथे असल्याचे समजले. त्यानुसार सायबर पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली. म्यूल अकाउंटमधील पैसे रोख स्वरूपात बँकेतून काढणारा मितेश व्होरा याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदार मीरा भाईंदर येथे आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी केपिन मेहता याला मीरा-भाईंदर येथून अटक केली. या गुन्ह्यात आणखी संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलिस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, सुरज शिंदे, जयश्री माळी, सरिता तुपे, शुभांगी ढोबळ, धरती वाडेकर, ईश्वरी आंबरे, वैशाली बर्गे, धनश्री प्रधान, मोनिका बिच्चेवार, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.