पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला दणका, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 08:01 IST2019-03-22T07:38:39+5:302019-03-22T08:01:26+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला दणका, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरीत झालेल्या युवक मेळाव्यात निहाल यांना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मंगलदास बांदल, वसंत लोंढे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे उपस्थित होते.