शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ऑडी चालकाची गुंडगिरी! बाईकस्वाराला धडक देत बोनेटवर ३ किमीपर्यंत फरफटत नेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:44 IST

पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑडी कारचालकाने तरुणाला धडक देत त्याला फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pimpri Chinchwad Crime : पुणे पोर्शे कार अपघातानंतर आणखी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पिंपरी चिंचवाड येथे एका ऑडी कारचालकाने बाईकस्वाराला धडक देऊन त्याला फरफटत नेलं आहे. कारचालकाने बोनेटवर पडलेल्या तरुणाला २-३ किमी फरफरट नेलं आहे. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणामळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बाईकवरुन जाताना कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर ऑडी कारचालकाने तरुणाच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे बोनेटवर पडलेल्या तरुणाला ऑडी कारचालकाने तब्बल दोन ते तीन किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक घडना घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आकुर्डीतील के टी एम शोरुम ते चिंचवडमधील बिजलीनगर दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा सगळा प्रकार घडला. १ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात पीडित तरुण चालत्या कारच्या बोनेटला लटकलेला दिसत आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जेकेरिया व त्यांचा मित्र हे बाईकवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव आलेल्या पांढर्‍या रंगाच्या ऑडी कारने धडक दिली. तेव्हा त्यांनी कारचालकाला धक्का का दिला असे विचारले. तेव्हा कमलेश व त्याच्या साथीदारांनी जेकेरिया आणि त्याचा मित्र अनिकेत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कमलेश व हेमंत यांनी तुला आज जिवंत सोडत नाही, असं म्हणत जेकेरियाच्या अंगावर कार घातली. त्यामुळे जेकेरिया गाडीच्या बोनेटवर पडला. तरीही कमलेश याने कार  भरधाव वेगाने चालवत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक, मंगल मेडिकल बिजलीनगर येथे आणली. त्यानतंर  कारमधील महिलेला उतरण्यासाठी त्यांनी कार थांबविली. त्यावेळी जेकेरियासुद्धा कारच्या बोनेटवरुन खाली उतरला. त्यानंतर आरोपी पळून गेले.

जेकेरिया जेकब मैय्थू (वय २३, रा. आण्णाभाऊ साठेनगर वसाहत, भक्ती शक्ती चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कारचालक कमलेश ऊर्फ अशोक पाटील, हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या, प्रथमेश पुष्कर दराडे या तिघांना अटक केली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस