पिंपळे गुरवला कडी - कोयंडा तोडत घरात घुसून चोरले सोन्याचे गंठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:50 IST2021-08-05T11:50:22+5:302021-08-05T11:50:30+5:30

घरातील साहित्यही अस्ताव्यस्त केले

Pimple Gurwala Kadi - Breaking the riddle, broke into the house and stole the gold knot | पिंपळे गुरवला कडी - कोयंडा तोडत घरात घुसून चोरले सोन्याचे गंठण

पिंपळे गुरवला कडी - कोयंडा तोडत घरात घुसून चोरले सोन्याचे गंठण

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून ६३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. नेताजी नगर, पिंपळे गुरव येथे मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा घरफोडीचा प्रकार घडला. 

नागेश ज्ञानोबा गुळभिले (वय ३३, रा. नेताजी नगर, पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी बुधवारी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने नागेश यांच्या घरचा कडी-कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरातून ६३ हजार रुपये किंमतीचे ३१.५ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेल्या गंठण चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक एम. डी. वरुडे तपास करीत आहेत.

Web Title: Pimple Gurwala Kadi - Breaking the riddle, broke into the house and stole the gold knot