ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:43 IST2025-05-11T14:42:49+5:302025-05-11T14:43:26+5:30
पोलिसांनी अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला

ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू
पिंपरी : सावलीत थांबलेल्या एका तरुणाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास येलवाडी येथे येलवाडी ते देहूगाव जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
मारोती दिनकर मुंडे (वय ३७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारोती मुंडे यांच्या पत्नीने (३०, रा. देहूगाव) शुक्रवारी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती येलवाडी गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर एका ट्रकच्या सावलीत थांबले होते. त्यावेळी ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवले. यावेळी फिर्यादीच्या पतीच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातात मारोती मुंडे यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.