मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा;आळंदीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:36 IST2025-05-11T14:35:04+5:302025-05-11T14:36:02+5:30
- वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसला केली धक्काबुक्की, अंमलदाराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.

मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा;आळंदीमधील घटना
पिंपरी : ज्ञानेश्वर माऊली ७५० वा रथोत्सव व केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की व धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी येथे घडली.
पोलिस अंमलदार संदीप रामचंद्र जगदाळे (वय ४४) यांनी याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील तुकाराम देवकर (रा. बोपखेल) व रवींद्र उत्तम खांडवे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वी हिंजवडी, माण येथेही पोलिसांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते.
फिर्यादीच्या हाताला लागला मार
नियमाचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकारकडून वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. तसेच अल्पवयीन चालकांच्या पालकावर गुन्हे दाखल करावेत, पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे. अनेक कंटनेरचालकही नियमांचे उल्लघंन करतात. भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.