महापालिकेच्या वेबसाईटवर तक्रार करायची चार दिवस थांबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:30 IST2025-06-13T09:29:34+5:302025-06-13T09:30:39+5:30

- दुरुस्तीच्या कामासाठी ऑनलाइन सेवा राहणार बंद

pimpari-chinchwad Wait four days to file a complaint on the municipal website | महापालिकेच्या वेबसाईटवर तक्रार करायची चार दिवस थांबा

महापालिकेच्या वेबसाईटवर तक्रार करायची चार दिवस थांबा

पिंपरी : महापालिकेची संगणक प्रणालीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वेबसाईट व ॲप शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी आठ ते सोमवारी (ता. १६) सकाळी सहापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे, जन्म-मृत्यू नोंदणीसह इतर सर्व कामे पुढील चार दिवस करता येणार नाही.

महापालिकेने नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरवण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट) विकसित केले. संकेतस्थळावर नागरिकांना विविध माहिती, सेवा आणि तक्रार करण्याचा सुविधा आहेत. यात मालमत्ता कर भरणे, जन्म आणि मृत्यूची नोंदणीसह विविध सुविधेचा समावेश आहे. तसेच विविध सार्वजनिक सेवांसाठी ऑनलाइन अर्ज आणि माहिती, शहराच्या विकास योजना आणि नियमांची माहिती, विविध नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांची माहिती, शहराशी संबंधित नवीन अपडेट्स, योजना आणि कार्यक्रमांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. 

सारथीही राहणार बंद...

महापालिकेने नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा वेबसाईट व सारथी ॲपवर उपलब्ध केली आहे. या सर्व सुविधा ऑनलाइन केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण, महापालिका प्रशासनाने संकेतस्थळ देखभाल दुरुस्तीसाठी पुढील चार दिवस संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी सहानंतर संकेतस्थळ पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेचे संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी तसेच त्यात काही त्रुटी होत्या. त्याबरोबरच अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी चार दिवस महापालिकेची पूर्ण संगणक प्रणाली बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, फोन हेल्पलाईन सुरू राहणार आहे. - निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad Wait four days to file a complaint on the municipal website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.