Video: पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टच्या दारात चिमुकलीचा हात अडकला; सोसायटीतील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:30 IST2026-03-14T15:30:09+5:302026-03-14T15:30:43+5:30

एका चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

pimpari-chinchwad video a childs hand gets stuck in the lift door in Pimpri-Chinchwad; CCTV video from the society goes viral | Video: पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टच्या दारात चिमुकलीचा हात अडकला; सोसायटीतील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Video: पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टच्या दारात चिमुकलीचा हात अडकला; सोसायटीतील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडलेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोसायटीतील लिफ्टमधून जात असताना एका चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील काही रहिवासी नेहमीप्रमाणे लिफ्टचा वापर करत होते. त्या वेळी दोन लहान मुली आपल्या कुटुंबियांसोबत लिफ्टमध्ये आल्या. यादरम्यान लिफ्टचे दार उघडताच त्यातील एका चिमुकलीने हात पुढे केला. मात्र, अचानक दार उघडतांना तिचा हात त्यात अडकला.



घटनेनंतर काही क्षण घबराट पसरली. उपस्थित नागरिकांनी तातडीने लिफ्ट थांबवून चिमुकलीचा हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर तिचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड: लिफ्ट के दरवाजे में बच्ची का हाथ फंसा; सीसीटीवी वीडियो वायरल।

Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक चौंकाने वाली घटना सामने आई जहां एक बच्ची का हाथ लिफ्ट के दरवाजे में फंस गया। सीसीटीवी फुटेज में निवासियों को उसकी मदद करते हुए दिखाया गया है। बच्ची को मामूली चोटों के साथ सुरक्षित बचा लिया गया। लिफ्ट सुरक्षा और माता-पिता की निगरानी पर चिंता जताई गई।

Web Title : Pimpri-Chinchwad: Girl's hand stuck in lift door; CCTV video viral.

Web Summary : A shocking incident occurred in Pimpri-Chinchwad where a girl's hand got stuck in a lift door. The CCTV footage shows residents helping her. The girl was safely rescued with minor injuries. Concerns are raised about lift safety and parental supervision.